
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी 2018 साली पीएम किसान योजना ( PM Kisan Yojana ) सुरू केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये दिले जातात. याचाच 14 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे 14 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
भीषण अपघात! कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, तर २ जण गंभीर जखमी
शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्माननिधी येण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यूपीच्या 2 कोटी 20 लाख लाभार्थ्यांना ही रक्कम जूनच्या 15 दिवसांमध्ये मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीमुळे त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील. या समस्यांचे निरासन करण्यासाठी शिबिराचे आयोजन देखील करण्यात येईल.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी ( Dr. Devesh Chaturvedi ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जूनच्या सुमारास पीएम किसान सन्मान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. ग्रामपंचायतीद्वारे शिबिर लावून योजनाधारासाठी शेतकऱ्यांची ईकेवायसी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीची तपासणी करून बँक खाते आधार कार्ड सोबत जोडले जात आहे.
अमृता फडणवीस धमकी प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती! शरद पवारांसह ‘या’ बड्या नेत्यांची नावे चर्चेत