शेतकऱ्यांचे (Farmers) अतिवृष्टीमुळे, रोगराई किंवा पाण्याची टंचाई अशा अनेक कारणांमुळे पिकांचे (crop) नुकसान होते. दरम्यान शेतकऱ्यांना थोडासा फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकार (Central government) आणि राज्य सरकार (State Govt) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. दरम्यान अशीच एक योजना आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता
2021-22 मध्ये जिल्ह्यात तीन वेळा पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतातील पिकांचे (agriculture crops) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान प्रशासनाकडून ज्या ज्यावेळी नुकसान झाले त्यावेळचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले आहे. तसेच विशेष म्हणजे याआधारे मदत निधीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला. दरम्यान मूल तालुका प्रशासनाने 35,000 शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी 22 कोटी 40 लाख रुपयांच्या निधीची (fund) मागणी केली होती.
महत्वाची बाब म्हणजे त्यानुसार शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आनंदाची बातमी म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. यामध्ये मग काही शेतकऱ्यांना (farmers) तीनही वेळा झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळणार आहे. तसेच मूल तालुक्यात लागवडीखालील क्षेत्र 26,288.14 हेक्टर आहे,तर 22,88 हेक्टर आर क्षेत्रावर धानाची लागवड (Cultivation) केली जाते.
धक्कादायक! दुर्गा पूजेला बकऱ्याच्या ऐवजी चिमुकल्याचाच गेला बळी, वाचा सविस्तर