Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर तेजीत

Good news for farmers! The price of cotton in the international market is booming

कापूस व सोयाबीनच्या पिकांना दर मिळण्यासाठी, नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊत यांची न्यायालयातून सुटका; 100 दिवसांचा वनवास अखेर आज संपला

यंदा संपूर्ण देशात 128 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करम्यात आली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान ( loss of cotton crops) झाले आहे. शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन फार कमी मिळाले असल्याने किमान कापसाला चांगला दर तरी मिळावा अशी अपेक्षा सर्व शेतकरी करत आहेत.

फलटण सातारा हायवे प्रवाशांना ठरतोय धोकादायक

मागील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात व राज्यात देखील कापसाचे दर कमी होते. पूर्ण ऑक्टोंबर महिन्यात कापसाचा दर कमी होता. परंतु,आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. यामध्ये एक नाही, दोन नाही तर चक्क साडेपाच टक्क्यांची वाढ झाली आहे.

स्वतःशीच लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केली प्रेग्नेंन्सीची पोस्ट; सोशल मीडियावर होतीये चर्चा

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ( cotton in international market) कापसाला प्रति क्विंटल 7000 ते 8,500 इतका दर मिळत आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. बळीराजाची यंदाची दिवाळी ही चिंतेतच गेली आहे. आता कापसाचे दर वाढल्याने किमान दिवाळी नंतर तरी त्यांची ‘दिवाळी’ होईल, असे वाटत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूधसंघ डबघाईला; कामगारांना पगार देण्याइतकी सुद्धा ऐपत राहिली नाही

Spread the love
Exit mobile version