Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नुकसानग्रस्तांसाठी राज्यसरकारने मंजूर केला कोटींचा निधी

Good news for farmers! The state government has approved a fund of crores for the victims

मागील अनेक दिवसांपासून अतिवृष्टीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सरकारवर आरोप केले जात आहेत. इतकंच नाही तर पंचनामा करायला आलेले अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहेत. ही गोष्ट निदर्शनास येताच नुकसान ग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा चर्चेचा झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain Fall) झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी सरकारकडून ( State Government )मंजूर करण्यात आला आहे.

भूक कंट्रोल न झाल्याने हत्तीने खाल्ले चक्क…; पाहा व्हिडीओ

पुणे आणि औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्यामार्फत हा निधी वितरित केला जाणार आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर आणि औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे मंजूर केले आहे. ही नुकसान भरपाई याआधी 6800 रुपये प्रतिहेक्टर इतकीच होती. परंतु आता ती 13600 रुपये प्रतिहेक्टर इतकी झाली आहे.

संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा; महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता

अथक प्रयत्नांनंतर मिळालेली ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ( Farmer’s Bank Account) जमा होणार आहे.याशिवाय मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील अधिकृतपणे उपलब्ध करून दिला जाणार आहे. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यातून वाचलेल्या पिकांना देखील आता दर मिळत नाहियेत. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्याने आनंद झाला आहे.

गाणी ऐकूण गायींच्या दुधात होते वाढ, तरुणाने केले सिद्ध; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version