
मुंबई : भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाचा शेतकरी हा महत्वपूर्ण घटक आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. या योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. दरम्यान अशाच एका योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ग्रामीण भागात शेतकरी शेतीतून पैसे मिळवण्यास मदत व्हाही म्हणून पशुसंवर्धन करतात. मग यामध्ये अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी या पशुधनातून अतिरिक्त नफा कमावतात. आणि अल्प भूधारक शेतकरी कमी खर्चात ते शेळीपालनाला महत्त्व देतात.याच महत्वाचं कारण म्हणजे शेळ्यांची फार काळजी घ्यावी लागत नाही.
तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही आरामात केली जाते.ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन करण्याची इच्छा आहे पण साधनांच्या अभावामुळे ते शक्य नाही. अशा या शेतकऱ्यांना नाबार्ड शेळीपालनासाठी भरघोस अनुदान देते. इतकेच नाही तर काही भारतीय बँका देखील आहेत ज्या या शेळीपालनासाठी सुमारे 4 लाखांचे कर्ज देतात.दरम्यान या कर्जातून पशुपालकांना संसाधनांच्या कमतरतेतही चांगले उत्पन्न मिळू शकेल.
या बँकांमध्ये अर्ज करा
जनावरांसाठी कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक इत्यादींचा समावेश आहे. तसेच या बँकांशिवाय नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्ज आणि अनुदानाची सुविधाही दिली जात आहे.
आवश्यक बाबी
1) शेळीपालनासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांना वार्षिक 11.20% दराने कर्ज भरावे लागते.
2)ही कर्ज सुविधा फक्त उच्च श्रेणीतील शेळ्या पालनासाठी दिली जात आहे.ज्यामध्ये 10 शेळ्याचे फार्म शेतकरी सुरू करू शकतात.