Eknath Shinde | आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. फक्त देशातच नाही तर विदेशातही तितक्याच जल्लोषात बाप्पाचे स्वागत केले जाते. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वचजण त्याची (Ganesh Chaturthi) आतुरतेने वाट पाहत असतात. आज घराघरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ जयघोषात गणरायाची प्रतिष्ठापना केली जात आहे. आजपासून राज्याच्या महाउत्सवाची सुरुवात झाली आहे. (Ganesh Chaturthi 2023)
Amruta Fadnavis । मोठी बातमी! अमृता फडणवीस खंडणीप्रकरणी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर
अशातच गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार आता काही गणेशभक्तांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोकणात जाणाऱ्या भक्तांचा टोल (Toll) माफ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तरीही वाहनचालकांकडून टोलची रक्कम घेतली जात आहे. निर्णय होऊनही पैसे कापले जात असल्याने वाहनचालक नाराज झाले आहेत.
याबाबत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी माहिती दिली आहे. “या प्रकरणी अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे याबाबतचा तपशील परिवहन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला जाणार आहे. त्यानंतर कारवाई पार केली जाईल. वाहनचालकांना त्यांची रक्कम फास्टॅग खात्यात परत मिळेल,” असे आश्वासन विवेक भीमनवार यांनी दिले आहे.