सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी महागाई भत्ता देण्यात येतो. यामध्ये ठराविक काळानंतर वाढ देखील करण्यात येते. वर्षातून दोनदा महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येते. यातील पहिली वाढ जानेवारी महिन्यात व दुसरी वाढ जुलै महिन्यात होते. दरम्यान, जुलैचा महिन्याचा महागाई भत्ता सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आला असून जानेवारी डीएमध्ये ( DA) वाढ मार्च 2023 मध्ये होणे अपेक्षित आहे. याची अंमलबजावणी येत्या जानेवारी महिन्यापासून होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
उद्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी दिली परवानगी
जानेवारी 2023 पासून दिला जाणारा महागाई भत्ता मार्च महिन्यातील थकबाकीसह दिला जाणार आहे. तसेच पेन्शन धारकांच्या डीआरमध्ये ( DR) देखील वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये मागील 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार आहे. मागील वेळेस सप्टेंबरमध्ये 48 लाख कर्मचारी व 68 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळाला होता. तसेच याआधी गेल्या वर्षी मार्च महिन्यात सरकारने महागाई भत्ता वाढवला होता.
मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटला? पंचसूत्री जाहीर करत अमित शहांनी साधला सुवर्णमध्य!
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Central Government Employe) महागाई भत्ता 38 टक्के आहे. मात्र जानेवारी महिन्यात यामध्ये 4 टक्क्यांची वाढ होऊन 42 टक्के होणे अपेक्षित आहे. दरम्यान 4 टक्के डीए वाढीचा मार्ग आता मोकळा झाला असून AICPI च्या निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार मार्च मध्ये महागाई भत्त्यात वाढ होईल असे सांगण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांचा लळा लावणारी खगोलशास्त्र क्लबची अनोखी कार्यशाळा संपन्न!