सरकारी नोकरी हवी अशी सर्वांचीच इच्छा असते. यासाठी अनेक तरुण दिवस रात्र कष्ट करतात. मात्र सर्वानाच सरकारी नोकरी मिळेल असही होत नाही. आता सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एफटीआयआयने तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. यामध्ये गट ब आणि गट क या पदासाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
चीनच्या नाकावर टिच्चून Tata Group लॉन्च करणार iPhone 15
रिपोर्टनुसार जे भारतीय नागरिक आहे त्यांनाच या संधीचा फायदा होणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये अर्ज करण्यासाठी 29 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. एफटीआयआय मध्ये गट ब आणि गट क यांसाठी 84 जागा शिल्लक आहेत. तरी ज्या उमेदवारांना एफटीआयआय मध्ये नोकरी करण्याची संधी हवी आहे आहे ते अर्ज करू शकतात.
शेतकऱ्यांनो काळ्या टोमॅटोची लागवड करा आणि घ्या भरघोस उत्पन्न, जाणून घ्या त्याची लागवड आणि बरच काही..
एफटीआयआय हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. तसेच दिव्यांग प्रवर्गातील लोक देखील या संधीचा फायदा घेऊ शकतात. एफटीआयमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराने पदवीधर व डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले असावे. एफटीआयआयमधील गट ब आणि क पदांसाठीची भरती लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे करण्यात येणार आहे. व अधिक माहितीसाठी एफटीआयआयच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ब्रेकिंग! समीर वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडे मागितले २५ कोटी? समोर आली धक्कादायक माहिती
FTII Pune Recruitment 2023 Apply Online | 84 Group B and C Vacancies https://t.co/aNeXzdeoVA pic.twitter.com/6C837ZjkIJ
— Indian Government Jobs (@indiangovtjobs) May 15, 2023