Share Market । शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूक खूप जोखीमेची असते. शिवाय त्यामध्ये निश्चित परतावाही मिळत नाही. तरीही सध्याच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक (Stock market investment) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जर तुम्ही योग्य त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. परंतु तुम्ही चुकीचा शेअर निवडला तर तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. (Latest Share Market News)
जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच सेन्सेक्स 70,000 चा करणार रेकॉर्ड करणार असल्याचा दावा दिग्गज इक्विटी गुंतवणूकदार विजय केडिया (Vijay Kedia) यांनी केला आहे. मागील महिन्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (Bombay Stock Exchange) 30 शेअरांच्या इंडेक्स सेन्सेक्सने 66,000 अंकांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. (Latest Marathi News)
Kusum Solar Yojana । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, कसं ते जाणून घ्या
सर्वात महत्त्वाचे म्हणजे परदेशी पाहुण्यांकडून इक्विटी बाजारात 1.21 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. केडिया यांच्या मतानुसार, येत्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये मोठी वाढ दिसेल. त्याशिवाय त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि धातू क्षेत्रापासून लांब राहण्याचा सल्लाही त्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.
Maharashtra Politics । स्वाभिमानीतील वाद पेटण्याची शक्यता? रविकांत तुपकरांना दिली 15 ऑगस्टची डेडलाईन