Site icon e लोकहित | Marathi News

नोकरी शोधनाऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ कंपनी करणार 9000 जागांची मेगाभरती

Good news for job seekers! 'This' company will do mega recruitment of 9000 seats

कोरोना काळात अनेक नागरिकांना (workers) कामावरून काढण्यात आले. तसेच अनेक मोठ मोठ्या कंपन्यांना टाळे लागले होते. दरम्यान आता नोकरी गेलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे एका मल्टिनॅशनल कंपनीने (multinational company) भारतात 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 9000 जागांसाठी मेगाभरती (Mega recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी फोन व चॅटच्या माध्यमातून कंपनी (company) या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

अरे बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सुविधा पुरवण्याचं काम भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. Matlab कस्टमर सर्व्हिस सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस’ असे या मल्टीनॅशनल कंपनीचं नाव आहे.

CNG आणि PNG च्या किमती 1 ऑक्टोबरपासून वाढणार? आतापर्यंतचा सर्वोच्च दर असणार

दरम्यान कंपनीच्या भारत व अमेरिका क्षेत्राच्या वरिष्ठ उपाध्यक्ष नीना नायर यांनी याबाबत माहिती दिली. माहिती देताना त्या म्हणाल्या की, “भारतात खूप चांगली व संघटित टॅलेंटची साखळी असल्याने या क्षेत्रात भारतअग्रेसर आहे. या कंपनीद्वारे नवीन तरुणांची भरती केली जाते. यामध्ये त्यांच्यातली कौशल्यं विकसित केली जातात. तसेच त्यातूनच नवे लीडर्स उदयाला येतात. कंपनीनं मागील वर्षी 5000 तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली होती.”

दसऱ्यापूर्वीच झेंडूचा भाव 70 रुपये किलोपर्यंत; आणखी भाव वाढण्याची शक्यता

पुढे नायर म्हणाल्या की, “निवड झालेल्या या कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्टिकल एक्स्पर्टीज आणि क्लायंट सर्व्हिसेसचं प्रशिक्षण देण्यात आलं. दरम्यान आता हे तरुण त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करीत आहेत. ‘ग्लोबल कस्टमर’ कंपनीला नुकताच ‘बीपीओ ऑफ दी इयर’ पुरस्कार मिळाला. कंपनीला नवीन वर्क ऑर्डर मिळत असून, व्यवसायात वृद्धी होत असल्याने पुन्हा 9000 जागांसाठी भरती निघाली असल्याचे नायर यांनी सांगितले.

आता लसणाच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता; वाचा आजचे दर

Spread the love
Exit mobile version