देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) जोडव्यवसाय करतात. त्यामुळे पशुपालकांना दुग्धव्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास खूप मोठी मदत होते. अशातच आता सहकारी आणि खासगी दूध संघांनी येत्या २१ जुलैपासून गायीच्या दुधाला ३४ रुपये दर दिले जावे, असे आदेश राज्य सरकारकडून (State Govt) देण्यात आले आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. (Latest Marathi News)
महेश कोठारे यांच्यावर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर; वडिलांनंतर आईचेही झाले निधन
सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. पशुपालनाला चालना मिळावी यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. सरकारच्या या योजनेचे नाव पशु किसान क्रेडिट कार्ड योजना (Pashu Kisan Credit Card Scheme) असे आहे. लाखो पशुपालक सरकारच्या या भन्नाट योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेद्वारे पशुपालकांना गाई खरेदीसाठी ४० हजार रुपयांचे तर म्हशीसाठी ६० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते.
Havaman Andaj : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये यलो अलर्ट
इतकेच नाही तर शेळीपालन किंवा कुक्कुटपालनासाठी कर्ज देण्यात येत आहे. या योजनेत तुम्हाला १ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज मिळते. ज्याचे व्याज फक्त ४ टक्के आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे पशुपालकांना हे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते. त्यामुळे तुम्ही आता या योजनेचा लाभ घेऊन जनावरांची खरेदी करू शकता.
Ajit Pawar । अजित पवारांनी पुन्हा एकदा डोळा मारला? नेमका कोणाला मारला डोळा? व्हिडीओही झाला व्हायरल
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागणार आहे. बँकेकडे तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक तसेच प्राणी आरोग्य प्रमाणपत्र, पशु विमा प्रमाणपत्र आवश्यक असते. इतकेच नाही तर बँक तुमचा क्रेडिट स्कोर तपासून कर्जाची रक्कम ठरवू शकते.
जेवणात टोमॅटो वापरल्याने बायकोला आला राग, केलं असं काही की.. तुम्हाला बसेल धक्का