महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! आता अॅमेझाॅन कंपनीने ठाण्यात केली मोठी गुंतवणूक

Good news for Maharashtra! Now Amazon company has made a big investment in Thane

महाराष्ट्रातील जनता राज्य सरकारवर संताप व्यक्त करत आहे. याचं मोठ कारण म्हणजे चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेले. दरम्यान या संतापात आणखी एक ठिंणगी पेटली ती म्हणजे नुकत्याच टाटा एअर बसचा प्रकल्प हातून गेला आहे. दरम्यान अशातच आता महाराष्ट्र (Maharashtra) राज्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सर्वात प्रसिद्ध (New Project) असणाऱ्या अॅमेझाॅन (Amazon) कंपनीने मुंबईच्या ठाणे येथे गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना, चक्क म्हशीच्या रेडक्यावर केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

‘ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस’ या कंपनीने तब्बल 1 हजार ८४० कोटी रुपयांची जागा खरेदी केली आहे. दरम्यान यासाठी तब्बल १३० कोटींचे मुद्रांकशुल्क भरल्याचे समोर येतं आहे. महत्वाची बाब म्हणजे घोडबंदर रस्त्याच्या माजीवाडा ते गायमुख या दरम्यान दुतर्फा मोठमोठी निवासी संकुले उभी करण्यात येत आहेत. दरम्यान याच निवासी संकुलांच्या पार्श्वभूमीवर आता पातळीपाडा-डोंगरीपाडा या परिसरात हिरानंदानी इस्टेट याभागात कंपन्यांची मोठी कॉर्पोरेट कार्यालये बांधण्यात येत आहेत.

कापसाच्या दरात झाली मोठी घसरण, शेतकरी सापडला दुहेरी संकटात

त्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या टाऊनशिप तेथे आल्या आहेत. म्हणून ॲमेझॉनने अशा सर्व विकासित क्षेत्राने घेरलेल्या भागात ही मोक्याची जागा घेतल्याची म्हटलं जात आहे. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस यांनी बाळकूम पाडा येथील ६० एकर जागा तब्बल 1 हजार ८४० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. ही जागा अनंता लँडमार्क्स या कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कंपनी कल्पतरू समूहाचा भाग आहे. त्यामुळे या जमिनीवर अॅमेझॉनकडून डेटा सेंटर उभे केले जाणार आहेत.

संत बाळूमामा नेमके कोण होते? वाचा सविस्तर माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *