MPSC : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यसेवा आयोगाकडून पदभरतीत 340 जागांची वाढ

Good news for MPSC students! Increase of 340 posts in State Service Commission recruitment

मुंबई : सध्या स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होता दिसतेय. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर येत आहे. राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) पद भरतीच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. एमपीएससीच्या या वर्षीच्या परीक्षेमध्ये 340 पदे वाढवली आहेत. याचा विद्यार्थाना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलीये. 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये 161 पदे होती. पण फक्त 161 पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून 340 पदे वाढल्याने एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून जागा कमी असल्याची तक्रार येत होती. त्यामुळे आता 340 पदे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *