OBC । ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून नवीन योजनेची घोषणा

OBC

OBC । राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसी समाज (OBC Reservation) आमनेसामने आला आहे. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी नेते नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Gutami Patil । आरक्षणाच्या वादात गौतमीची उडी, केलं मोठं वक्तव्य

“इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना (OBC students) थेट लाभ देणारी महत्वाकांक्षी अशी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा दिलासा

प्रत्येक जिल्ह्यातून ६०० प्रमाणे २१ हजार ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी निवास भत्ता, भोजन भत्ता आणि निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असणाऱ्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. सरकारने देखील या योजनेसाठी प्रतिवर्षी १०० कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. ज्याचा फायदा या विद्यार्थ्यांना होईल.

Political News । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love