Site icon e लोकहित | Marathi News

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! पठाण चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

Good news for Shah Rukh Khan fans! The film will release on OTT on 'Ya' day

मागच्या काही दिवसापासून पठाण चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.

झोपलेल्या व्यक्तीजवळ जाऊन बसले तीन चित्ते अन् पुढे घडल असं की, पाहून तुम्हीही व्हाल थक्क; पाहा Video

हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित होऊन 7 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत त्यामुळे आता हा चित्रपट OTT वर कधी प्रदर्शित होणार याची चाहते वाट पाहत आहेत. दरम्यान आता याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

OTT वर चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पठाण’ चित्रपट 22 मार्च 2023 रोजी OTT वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

फक्त तीनच आठवड्यांत गौतम अदानींची वाढली ‘इतकी’ संपत्ती; वाचा सविस्तर…

या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल पाहिले तर शाहरुख खान व्यतिरिक्त यामध्ये दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या ‘पठाण’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये सलमान खानचाही कॅमिओ आहे.

कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळे कर्मचारी आमचेच…”

Spread the love
Exit mobile version