ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Good news for sugarcane farmers! Central government has taken 'this' big decision

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक यावर नुकतेच आंदोलन झाले होते. राज्यसरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफआरपी ( FRP) दोन टप्प्यात विभागल्याने देखील शेतकरी वर्ग नाराज होता. आता मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने ( Central Government) नुकतीच इथेनॉल ची निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे.

बैलगाडा शर्यतींचा डाव पुन्हा रंगणार; सुप्रीम कोर्टाची सुनावणी

यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प जास्त दिवसांसाठी चालू ठेवण्यात येणार आहे. याआधी देखील साखर कारखान्यांना ऊसाचा रस, मळी, पाक, निकृष्ट धान्य यापासून इथेनॉल तयार करण्यास मान्यता होती. यामध्ये केंद्र सरकारने आता साखरेचा देखील समावेश केलाय. याचा फायदा साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

“माझी बायको होशील का?” इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

यासाठी केंद्र सरकारने एक खास समिती स्थापन केली आहे. तसेच इथेनॉल ( Ethanol Production) निर्मितीसाठी साखर देणाऱ्या प्रकल्पांच्या नोंदी काटेकोरपणे केल्या जाव्यात असा आदेश सरकारने दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने कारखाने फायद्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा चांगला लाभ होईल यात शंका नाही. यामुळे शेतकरी वर्ग देखील चांगलाच खुशीत आहे.

शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय; म्हणाला अडचण दूर करा अन्यथा…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *