मागील अनेक दिवसांपासून राज्यात विभागून एफआरपी देण्यावरून वातावरण तापले होते. राज्य सरकारने एफआरपी विभागून देण्याचा निर्णय दिला घेतला होता. यावर राज्यातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची मागणी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti) यांनी तर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे
शिंदे गटाला मोठा धक्का! शिंदे गटातील ‘या’ नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी ( FRP) देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले.
“…तर वीजबिलाबाबत मध्यप्रदेश पॅटर्न राबवावा” – देवेंद्र फडणवीस
दरम्यान बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. यासाठी शिंदे- फडणवीस सरकार प्रयत्नशील असेल असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना खुश ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे देखील ते म्हणाले आहेत. अथक प्रयत्नांनंतर सरकारने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.