मध्यंतरी एलपीजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत होते. परंतु सरकारने सध्या नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. यामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती मध्ये घसरण ( Fall in cylinder prices ) झाली आहे.
सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच
एलपीजी गॅस सिलेंडर विकणाऱ्या पेट्रोलियम कंपनीने ( Petroleum Company ) नवीन दर जाहीर केले आहे. हे बदल व्यावसायिक सिलेंडरमध्ये करण्यात आले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासून व्यावसायिकांना सिलेंडर 172 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. दिल्लीमध्ये या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 83.5 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मे च्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1773 रुपये झाली आहे. हे बदल फक्त व्यावसायिक सिलेंडरमध्ये झालेले आहेत. घरगुती सिलेंडर मध्ये कोणताही बदल झालेला नाही.
अवघ्या महिनाभरातच तुकाराम मुंढे यांची बदली; ‘या’ महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. कोलकत्ता मध्ये एक मे पासून 1875.5 रुपयांना उपलब्ध होईल. व्यावसायिक सिलेंडरची किंमत चेन्नईमध्ये 1937 रुपये होईल. कोलकत्ता मध्ये व्यवसायिक सिलेंडर 85 रुपयांनी तर मुंबईमध्ये 83.5 रुपयांनी व चेन्नईमध्ये 84.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
नामांतराच्या घोषणेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, “नामांतराचे श्रेय…”