
मुंबई : आता लवकरच भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC) इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान या केंद्रात मेडिकल/साइंटिफिक ऑफिसर, टेक्निकल अधिकारी पदांसाठी ही भरती असणार आहे. पदांची एकूण संख्या 50आहे. दरम्यान पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.barc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा. तसेच अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ असणार आहे.पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
Urfi Javed: आली लहर केला कहर! मोबाईलमधील सिमकार्डपासून बनवला उर्फी जावेदने ड्रेस
भरतीसाठी पदे आणि संख्या
1) वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी – १५ पदे
2) तांत्रिक अधिकारी-क – ३५ पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी-क –
1) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेलं असावे.
2) उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
3)उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
4)उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करण आवश्यक आहे.
5) या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रं
1) Resume (बायोडेटा)
2) शाळा सोडल्याचा दाखला
3)दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
4) जातीचा दाखला
5) पासपोर्ट साईझ फोटो
6) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का! वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर आता ‘ही’ दिग्गज कंपनीनीही होणार स्थलांतरीत