सध्या देशातील शेतकरी कांद्याला (Onion) मिळत असलेल्या बाजारभावामुळे निराश आहेत. तसेच आत्ताच्या परिस्थिती सोयाबीनला (soyabean) पिकला बऱ्यापैकी बाजारभाव मिळत आहे. दरम्यान अशातच शेतकऱ्यांसाठी(Farmers) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उडीद (Udid) पिकला चांगल्या प्रमाणात बाजारभाव (market price) आहे. यामुळे उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या चांगले दिवस सुरू झाले आहे.
Abdul Sattar: “कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा” ; अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त वक्तव्य
राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत उडीदाचा बाजारभाव ठरवण्यात आला आहे. दरम्यान काल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उडदाला 10 हजार 100 रुपयांचा सर्वाधिक कमाल भाव मिळाला आहे. यामुळे उडीद उत्पादक शेतकरी खुश असून त्यांचे सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. बाजार समितीमध्ये केवळ 15 क्विंटल काळ्या उडदाची आवक झाली होती.
दरम्यान या उडदासाठी किमान भाव 6200 तर कमाल 10 हजार 100 आणि सर्वसाधारण भाव 7150 इतका मिळाला. इतर पिकांच्या तुलनेत उडीदला चांगला बाजारभाव मिळत आहे. आज उडदाची सर्वाधिक आवक दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. ही आवक 1534 क्विंटल इतकी झाली असून यासाठी किमान भाव 6 हजार 300, कमाल भाव 7 हजार 845 आणि सर्वसाधारण भाव 7 हजार 75 रुपये इतका मिळाला आहे. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकरी आनंदीच आनंदी आहेत.