Government scheme । आनंदाची बातमी! ५०% अनुदानावर आजच करा शेळीपालन, काय आहे योजना? जाणून घ्या

Good news! Goat rearing today on 50% subsidy, what is the plan? find out

Government scheme । भारत (India) हा कृषिप्रधान देश आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. परंतु, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच शेतीमालाला नसणारा भाव त्यामुळे अनेकांना शेती परवडत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय करतात. देशभरातील लाखो शेतकरी हा व्यवसाय (Animal husbandry business) करून महिन्याला चांगली कमाई करत आहेत. तुम्हीसुद्धा आता हा व्यवसाय करून लखपती होऊ शकता. (Latest Martahi News)

Chanakya Niti । शत्रूवर सहज विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्यांच्या लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

समजा आता तुमच्याकडे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही सरकारी मदत घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता. राज्य सरकारने (State Govt) शेळीपालन अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत (Goat rearing) २० शेळ्या आणि दोन बोकडांसाठी ५०% अनुदान दिले जात आहे. दोन टप्प्यात हे अनुदान दिले जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये उस्मानाबाद, गोंदीया, यवतमाळ आणि सातारा तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड, भंडारा अशा 7 जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना शेळी गटाची स्थापना करावी लागणार आहे.

Flood Situation : अजित पवारांनी बोलावली राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक; पुरस्थितीचा घेणार आढावा

  • एका शेळी गट वाटपाची रक्कम 2 लाख 31 हजार रुपये इतकी असेल.
  • सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान म्हणजेच रुपये 1 लाख 15 हजार 700 रुपये त्या गटाला मिळतील.
  • हे लक्षात ठेवा की अनुदान गटवाटप स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात निम्मी रक्कम म्हणजे 25% व दुसऱ्या
  • सहा महिन्यात उरलेली 25 टक्के रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
  • या योजनेसाठी तुमच्या नावावर कमीत कमी 2000 चौरस फूट जमीन असावी.

Viral Video । धबधब्यातील दगडावर उभा राहून तरुण रील बनवत होता; तेवढ्यात पाय घसरला अन् घडलं भयानक; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे 5 जुलै 2023 ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत भरून पंचायत समितीमध्ये जमा करा. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून आता तुम्हीदेखील योजनेचा लाभ घेऊ शकता.

Mumbai News : बाळ नाल्यात पडलं त्यावेळी नेमकं काय घडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा क्षण

Spread the love