शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून केंद्र सरकार (Central Govt) आणि राज्य सरकार (State Govt) वेगेवेगळ्या योजना राबवत असते. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची व आनंददायी बातमी समोर आली आहे. सरकार आता जमीन (land) खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देत आहे. पाहुयात हा लाभ कोणाला मिळणार आहे.
cup syrup: कफ सिरपमुळे लहान मुले दगावली, राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत शेतजमीन खरेदी करण्यासाठी भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना हे अनुदान मिळणार आहे. या योजनेमध्ये शासनाने आमूलाग्र बदल केला आहे. आता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे.
Raja Hindustani: आता असा दिसतोय राजा हिंदुस्थानीमधील ‘हा’ बालकलाकार
कोणाला मिळेल लाभ?
ज्या लोकांना स्वतःची काहीच जमीन नाही अशा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे या मजुरांचा फायदा होऊन आर्थिक उत्पन्नातही वाढ होईल. त्याचबरोबर मजुरीवर असलेले अवलंबन देखील कमी होईल. यासाठी शंभर टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन त्याचबरोबर 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येत आहे.