महागाई भत्ता कधी वाढेल ? याकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष असते. डीए वाढला की, लोकांचा पगारही वाढतो. दरम्यान हिमाचल प्रदेश राज्यात ( Himachal Pradesh State) महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. येथील राज्य सरकारने सध्याचे सरकारी कर्मचारी आणि माजी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ( Retired Government Employee) महागाई भत्त्यात (DA) वाढ लागू केली आहे. तेथे जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरु झाल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकत्याच हिमाचल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी महागाई भत्ता वाढीची घोषणा केली. यासंदर्भातील अधिसूचना देखील यावेळी जाहीर करण्यात आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे महागाई भत्ता वाढल्याने २.२५ लाख कर्मचारी, ९० हजार सेवानिवृत्त कर्मचारी व ३ लाखांहून अधिक इतर लोकांना फायदा होणार आहे. १ जानेवारी २०२२ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा महागाई भत्ता रोख स्वरुपात मिळणार आहे.
IPL | ‘त्या’ वादाचा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना मोठा फटका! मॅच फी मध्ये होणार कपात
हिमाचल प्रदेश सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त लोकांना याआधी फक्त ३१ टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. मात्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार सर्व पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४ टक्के वाढीव दराने लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे. तो अंदाजे ५०० कोटी रुपयांचा असेल. अशी शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.
mobile । रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवताय तर सावधान! ‘हे’ आहेत धोके..