Site icon e लोकहित | Marathi News

खुशखबर! अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ; सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Good news! Increase in remuneration of Anganwadi workers; The government took 'this' important decision

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मागील काही दिवसांमध्ये विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली होती. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. असे सांगण्यात आले होते.

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या या मागण्यांबाबत सरकारमध्ये चर्चा झाली आहे व काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असून आता त्यांना मोबाईल फोन्स देखील दिले जाणार आहेत. एवढंच नाही तर अंगणवाडी सेविकांच्या ( Anganwadi Workers) सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे कर्मचारी व सरकारच्या सहकार्याने ही योजना सुरू राहणार आहे.

‘त्या’ एका अहवालाने सगळा गेम बदलला; अदानी ठरले टॉप लुझर आणि एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत

मागील बैठकीमधील महत्त्वाचे निर्णय

1) अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता.
2) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेमधील प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचे आदेश.
3) पोषण आहाराच्या दरात वाढ होणार
4) महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे अंगणवाडी वर्ग भरविण्याच्या सूचना
5) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार

आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घडला हा किस्सा

Spread the love
Exit mobile version