भारतात गरोदर स्त्रियांना (Pregnant woman) सहा महिन्यांची सुट्टी मिळते. मात्र लवकरच महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेचा कालावधी ( Maternity Leave Period) वाढवला जाऊ शकतो. देशातील गरोदर स्त्रियांना नऊ महिन्याची सुट्टी द्यावी, असे निर्देश केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी संस्थांना द्यावेत अशी शिफारस नीती आयोगाकडून (Niti Aayog) करण्यात आली आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी ही शिफारस केली आहे. यामुळे अगामी काळात गरोदर स्त्रियांना सहा महिन्यांऐवजी नऊ महिन्यांची सुट्टी मिळू शकते.
खासगी आणि सार्वजनिक विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी 6 महिन्यांवरुन वाढवून 9 महिने करणे आवश्यक आहे. महिलांना गरोदरपणात स्वत:ची आणि आपल्या बाळाची देखील जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे प्रसूती रजेचा कालावधी वाढवण्याची गरज आहे. तसेच रजा संपल्यानंतर मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी खासगी क्षेत्राने शिशुगृह अर्थात नर्सरी उघडण्याची गरज आहे. असे व्ही. के. पॉल यांनी आपल्या शिफारशीमध्ये मांडले आहे.
Gautami Patil | सेलेब्रिटींसाठी गौतमी पाटील नॉट रीचेबल ! नक्की काय आहे प्रकरण ?
नोकरी करणाऱ्या ‘महिला कर्मचाऱ्यांना मातृत्त्वासाठी मिळणारी रजा’ हा कायम चर्चेचा विषय असतो. या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच आई म्हणून एक नवीन जबाबदारी देखील त्यांना पार पाडावी लागते. या काळ महिलांसाठी कठीण काळ म्हणून समजला जातो. या काळात महिलांसाठी गोष्टी अधिक सोयीस्कर व्हाव्यात यासाठी सशुल्क प्रसूती रजा दिली जाते.
मोठी बातमी! क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल, WTC Final मध्ये ‘या’ तीन नियमांचा समावेश; जाणून घ्या…