
Chandrayaan-3 । 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान-2 (Chandrayaan-2) ही लाँच करण्यात आले होते. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडरला (Vikram Lander) या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविले होते. परंतु, सॉफ्ट लँडिंगवेळी त्यांचा इस्रोशी संपर्क तुटला. त्यानंतर आता चंद्रयान-3 (Chandrayaan-3) अवकाशात झेपवण्यासाठी सज्ज झाले आहे. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी वैज्ञानिकांकडून खूप मेहनत घेतली जात आहे.
पुलाच्या कठड्याला धडकून बसचा भीषण अपघात; चालकासह १५ जण जखमी
दरम्यान, चंद्रयान-3 हे आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन (Satish Dhawan Space Centre) 14 जुलैला लॉन्च होणार आहे, असे इस्त्रोकडून (Istro) जाहीर करण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 चं प्रक्षेपण होणार असल्याची महत्त्वाची माहिती इस्त्रोकडून ट्विटरवर देण्यात आली आहे. चंद्रयान-3 हे मिशन चंद्रयान-2 चं रिपीट मिशन असणार आहे हे इस्त्रोने यापूर्वी स्पष्ट केले आहे.
इस्त्रोकडून याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. मोहिमेचे बजेट एकूण 651 कोटी रुपये इतके असून जर याच लँडिंग यशस्वी झालं तर अशी मोहिम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरू शकतो. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी चंद्रावर आपले स्पेसक्राफ्ट उतरले आहेत.