JioBook laptop । भारतीय बाजारात सध्या लॅपटॉपची (Laptop) मागणी वाढू लागली आहे. कारण स्मार्टफोन प्रमाणेच लॅपटॉपचा (Uses of Laptop) देखील वापर वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपले नवनवीन आणि जबरदस्त फीचर्स असणारे लॅपटॉप लाँच करू लागल्या आहेत. प्रत्येक कंपनीच्या लॅपटॉपची किंमत (Laptop Price) आणि फीचर्स वेगवेगळे असतात. (Latest Marathi News)
अशातच आता रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपला नवीन JioBook लॅपटॉप लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूप कमी किमतीत हा लॅपटॉप (New JioBook Laptop) तुम्हाला खरेदी करता येईल. कंपनी आपला आगामी लॅपटॉप 31 जुलै रोजी लाँच (JioBook Laptop Launch Date in India) करणार आहे. ज्यात तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील. जाणून घेऊयात या लॅपटॉपबद्दल सविस्तर माहिती.
Mumbai Pune Expressway । पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कोसळली दरड, वाहतुकीवर झाला खूप मोठा परिणाम
कंपनीच्या नवीन तुम्हाला लॅपटॉपमध्ये 4G कनेक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे. तसेच कंपनीकडून यात ऑक्टाकोर प्रोसेसरही दिला जाणार आहे. नवीन लॅपटॉपमध्ये एचडी व्हिडिओ वापरता येणार असून तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरता येईल. यामध्ये लाइटवेट डिझाइन उपलब्ध असून त्याचे वजन 990 ग्रॅम इतके असेल. हा लॅपटॉप पूर्ण दिवस बॅटरी बॅकअप देईल. कंपनीचा आगामी 31 जुलै रोजी अनावरण होईल.
Irshalwadi Landslide । मोठी बातमी! फक्त आठवणी उरल्या… इर्शाळगडावरील शोधकार्य आजपासून बंद
दरम्यान, कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये JioBook लाँच केले होते. जो एक कंपनीचा बजेट लॅपटॉप आहे, ब्राउझिंग आणि ऑनलाइन क्लासेस इत्यादीसाठी त्याचा वापर केला जाईल. या लॅपटॉपमध्ये 11.6-इंचाचा HD डिस्प्ले दिला असून याच्या फ्रंटला 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, अॅड्रेनो 610 GPU आहे. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 2GB रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज दिले आहे. यात तुम्ही 128 GB पर्यंतचे SD कार्ड टाकू शकता. कंपनीचा लॅपटॉप JioOS वर काम करतो.