
‘व्हॉट्सअप’ हे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे मेसेंजर अँप आहे. आपल्यापैकी बरेच लोक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप वापरतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? आता व्हॉट्सअप वरून कर्ज (Loan) सुद्धा मिळणार आहे. अडचणीच्या वेळी कुठल्याही कागदपत्रांशिवाय १० लाखांपर्यंतचे डिजिटल कर्ज मिळणार आहे. IIFL फायनान्स कंपनीने ग्राहकांसाठी ही सुविधा आणली आहे. (loan on Whatsapp)
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला
IIFL कंपनीमार्फत ग्राहकांना त्वरित कर्ज मिळणार आहे. कोणत्याही लघु किंवा सूक्ष्म उद्योगासाठी हे कर्ज कंपनीकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. अशाप्रकारे डिजिटल स्वरूपात व्यवसायिक कर्ज मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते पैसे मिळण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. भारतातील ४५० मिलियन व्हॉट्सअप युझर्सना (Whatsapp Users) या लोनची सुविधा मिळणार आहे.
गांजाच्या नियंत्रित शेतीसाठी प्रयत्न सुरू; ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय…
या कर्जासाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर, तो योग्य वाटला आणि तुम्ही पात्र ठरला तर सहज कर्ज मंजूर होईल. कर्ज मिळवण्यासाठी ‘9019702184’ या नंबरवर “हाय” टाईप करुन पाठवावे. दरम्यान IIFL फायनान्स ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल NBFC कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या भारतभर अनेक शाखा आहेत.