Rain in Maharashtra । पुणे : सध्या पावसाला (Rain) पोषक अशी स्थिती तयार झाली नाही त्यामुळे सध्या राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. भर पावसाळ्यात पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Rain Update)
Bhiwandi Building collapses । भिवंडीत दुमजली इमारत कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जखमी
अशातच आता राज्यातील पावसासंदर्भात हवामान खात्याकडून (IMD Alert) माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत जात असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडेल. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज जोरदार पाऊस पडणार असून या भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Heavy Rain in Maharashtra)
Accident News । भाजप माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघात! कारचा अक्षरशः चुराडा, आमदार मुलाचा हातच..
या महिन्यात कोसळणार मुसळधार
दरम्यान, कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे प्रदीर्घ विश्रांतीनंतर येत्या पाच ते सात दिवस पुणे परिसरात पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग पाहायला मिळेल. पुणे घाट विभागामध्ये दोन दिवस यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मागील महिन्यात पुणे आणि परिसरामध्ये 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. परंतु या महिन्यात हे चित्र बदलेल.
धरणातील पाणीसाठ्यात होईल वाढ
या महिन्यामध्ये हवामान खात्याने ९१ ते १०९ टक्के पाऊस पडेल अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जर आता पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली तर शेतकऱ्यांवरचे संकट टळू शकते. धरणातील पाणीसाठ्यात देखील पुन्हा वाढ होईल.
Jalna News । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड