Monsoon Update : वेळेवर पाऊस पडेल का, या चिंतेने शेतकरी राजा तसेच इतर लोक देखील पावसाची वाट बघत असतात. परंतु आता पावसाची वाट बघणाऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. मान्सूनचे केरळमध्ये (Arrival of Monsoon in Kerala) आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) ही घोषणा करण्यात आलेली आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतकरी राजाची मोठी चिंता दूर झाली आहे.
तिकडे मोठ्या बहिणीचं लग्न झालं अन् इकडे बारक्या बहिणीसोबत घडलं भयानक, वाचून बसेल धक्का
यावर्षी जवळपास एका आठवड्याने उशिरा केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. लवकरात लवकर राज्यात देखील पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी प्रचंड उन्हाळ्याची झळ लोकांना सोसावी लागली. मान्सून देखील यावर्षी उशिराने दाखल झाला आहे. परंतु आता मान्सूनचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेला पूर्णविराम लागला आहे. केरळमधील बऱ्याच भागांमध्ये आज पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु यावर्षी पाऊस तब्बल 7 दिवसांनी उशिरा दाखल झाला आहे.
भटक्या कुत्र्यांना टाकले प्रेयसीच्या शरीराचे तुकडे, मीरा रोडमधील घटनेबाबत समोर आली धक्कादायक माहिती
दरवर्षी 1 जूनला दाखल होणारा मान्सून यावर्षी 8 जूनला दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टीला 16 जून किंवा त्यानंतर मॉन्सून बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून बाबत हवामान विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी अशी माहिती दिली आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) व बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेत पाऊस पडणार आहे. सुमारे 12 जूनच्या नंतर बिपरजॉय चक्रीवादळ कमी झाल्यानंतर पावसाचे प्रमाण देखील कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.