मुंबई : गॅस सिलिंडरबाबत सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चक्क 300 रुपयांनी गॅस (Gas Cylinder) स्वस्त झाला असून फकत 750 रुपयांमध्ये सिलिंडर मिळत आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही सहज आणि स्वस्तात गॅस सिलिंडर बुक करू शकणार आहात. इंडेन ही सरकारी तेल कंपनी आहे. या तेल कंपनीने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरु केली असून फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, आख्खी पिकेच करावी लागतेय नष्ट
महत्वाची बाब म्हणजे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गॅस सहजपणे ट्रान्सफर (transfar) करु शकता. सध्या हे सिलिंडर 28 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहेत. कंपोझिट सिलेंडर बाकी सिलिंडर पेक्षा वजनाने हलके असतात. तसेच या सिलिंडरमध्ये 10 किलो गॅस (gas) मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमत कमी आहे.
Bollywood: बॉलीवूडमधील ‘हे’ अभिनेते ‘फिटनेस फ्रीक’ म्हणून ओळखले जातात, फिटनेससाठी अशी घेतात मेहनत
इंडेन कंपनीची ही सुविधा सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.कारण सध्या देशभरात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. अशा परिस्थितीत सरकारी कंपनी इंडेनकडून तुम्हाला 750 रुपयांना सिलिंडर दिला जात आहे.