Varas Nond Online । जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या नावावर असलेली शेतजमीन (Land) ही त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळतात. परंतु त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद असणे खूप महत्त्वाचे आहे. वारसांना 3 महिन्यांच्या आत नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पूर्वी त्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये (Talathi Office) जाण्याची गरज पडत होती. आता त्यांची ही समस्या दूर होणार आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या फुटीबाबत शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट
तुम्हाला आता घरबसल्या वारसा नोंदीसाठी (Varas Nond) ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Varas Nond Online Application) करता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांची अडचण लक्षात घेता ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार अशा अनेक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या फुटीबाबत शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट
त्यामुळे आता तलाठी कार्यालयात नागरिकांना चकरा माराव्या लागणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे राज्यात १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरु केली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. जर तुम्हाला हा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइटवर जावे लागणार आहे.
Johny Lever Birthday । जॉनी लिव्हर दिवसाला कमावत होते ५ रुपये, जीवही देण्याचा प्रयत्न केला पण..
त्यानंतर हा ऑनलाईन अर्ज संबंधित तलाठ्याकडे पाठवण्यात येईल. या अर्जाची ऑनलाइनच पडताळणी केली जाईल. जर अर्जदाराची सर्व कागदपत्रे पूर्ण असतील, तर त्याची लगेचच नोंद सातबारा उताऱ्यावर करून दिली जाणार आहे.