आनंदाची बातमी! घरकुल योजनेतील लोकांना मिळणार मोफत वाळू; नवीन शासन निर्णय जारी

Good news! People under Gharkul Yojana will get free sand; Issued a new government decision

मध्यंतरी सरकारने वाळू संबंधित नवीन धोरण आणले होते. नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी व अवैध वाळू उपशाला लगाम लागावा यासाठी हे धोरण आखले होते. ( New Sand Policy 2023) सरकारने आता या धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर ( Ahamadnagar) जिल्हा आघाडीवर असून या जिल्ह्यात वाळू गट आणि डेपो स्थापन केले आहेत. यामध्ये नऊ वाळू गट आणि तीन डेपोंचा समावेश होता. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यासाठी मंजुरी दिली आहे. (People under Gharkul Yojana will get free sand)

खुशखबर! पाच लाखांपर्यंतचे उपचार होणार आता मोफत; केंद्र सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

नवीन रेती धोरणानुसार ग्राहकांना इथून पुढे वाळूसाठी प्रतिब्रास सहाशे रुपये मोजावे लागणार आहेत. महसूल विभागाच्या वेबसाईटवर हे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. नवीन रेती धोरण अवलंबवण्यासाठी तालुका स्तरावरील समिती नेमण्यात येणार आहे. यामध्ये तहसीलदार हे अध्यक्ष असतील. तर वैज्ञानिक, गटविकास अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील या समितीमध्ये सामील करण्यात येणार आहे.

Viral : सार्वजनिक ठिकाणी तरुणीला रिल्स बनविणे पडले महागात पोलीस महिला आली अन् तरुणीला…” पाहा Video

येत्या १ मे पासून लोकांना फक्त ६०० रुपयात घरपोच वाळू देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान आवास योजना म्हणजेच घरकुल योजनेतील ( Gharkul Yojana) लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असून वाळूच्या वाहतुकीचा खर्च मात्र ग्राहकाला द्यावा लागणार आहे. ही वाळू घरापर्यंत पोहोच करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा इतर वाहनाचा वापर करणे बंधनकारक आहे. यासाठी अन्य वाहनाचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

milk production: ‘हे’ चॉकलेट खाल्ल्याने जनावर देणार जास्त दुध; वाचा सविस्तर माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *