रुबाबदार गाडी घ्यायची म्हंटल तर लोकांमध्ये बुलेट ची प्रचंड क्रेझ आहे. आज सर्वच ठिकाणी आपल्याला बुलेटप्रेमी पहायला मिळतात. यामुळेच Royal Enfield ही देशातील आघाडीची परफॉर्मन्स बाईक बनवणारी कंपनी बनली आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी कायम नवे अपडेट आणत असते.
कोटींच्या घरात फायदा करून देणारे ‘हे’ झाड तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर
नुकतेच या कंपनीने हंटर 350 लॉन्च केले. यामुळे रॉयन इनफिल्ड आता नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे पहायला मिळते. या बाईकची चाचणी नुकतीच पार पडली असून हे मॉडेल bullet 350 चे असू शकते. ही नवीन बुलेट J-Series प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन Classic, Meteor आणि Hunter बाईक बनवण्यात आल्या आहेत. ही नवीन बुलेट अगदी क्लासिक 350 प्रमाणेच दिसते.
चक्क अजगराने केला बिबट्यावर हल्ला; दोघांची लागली झुंज
रॉयल इनफिल्ड च्या नवीन बाईकची वैशिष्ट्ये
1) या बाईकवरील टू-पीस सीटला सिंगल-पीस सीटमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.
2) फेंडरच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
3) या बाईकमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन पॉडची सुविधा असण्याची शक्यता आहे.
4) यामध्ये परिपक्व असे 350 सीसी इंजिन देखील असू शकते.
5) यामध्ये ड्रम ब्रेक असण्याची शक्यता अधिक आहे.
अरे बापरे ‘या’ ठिकाणी मोठा चमत्कार! चार पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा झाला जन्म