
शेतीच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. यासाठी अनेक योजना देखील राबविण्यात येतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
वीजबिल भरण्याबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर
या योजनेचा 12 वा हप्ता ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला होता. यावेळी देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटींची रक्कम पाठवली गेली होती. सध्या मात्र 13 व्या हप्त्यासाठी ( 13th installment) शेतकरी उत्सुक आहेत. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली असून 17 फेब्रुवारीपर्यंत 13 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनचं शूटिंग झालं पूर्ण; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
पीएम किसान योजनेच्या ( PM Kisan Yojana) 13 व्या हप्त्यासाठी सरकारने काही नियम कडक केले होते. या योजनेत खोटी कागदपत्रे दाखवून लाभ घेतल्याचे व फसवणूक केल्याचे समोर येताच सरकारने ई-केवायसी व जमिनीच्या नोंदी करून घेणे अनिवार्य केले होते. याशिवाय रेशनकार्ड लिंक करण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या होत्या.
जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या अडचणीत वाढ? राज्य महिला आयोगाने घेतली दखल
या नियमांचे पालन ज्या शेतकऱ्यांनी केले आहे त्यांना पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता लवकरच प्राप्त होणार आहे. हे नियम पूर्ण करण्यासाठी शेतकरी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी शेतकरी त्यांच्या जवळील कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
Finance कंपनीच्या हप्तेवसुलीतून झालेल्या वादात तरुणावर गोळीबार