![Good news! Total onion subsidy will be available till August 15](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2023/07/Onion.jpg)
राज्यात कांद्याचे (Onion) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु कांद्याला अजूनही पाहिजे तसे भाव मिळाले नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्ग (Farmers) अडचणीत सापडला आहे. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच राज्यातील ३,०२,४४४ शेतकऱ्यांना अनुदानाचे ७५६ कोटी रुपये मिळणार आहेत. (Latest Marathi News)
धक्कादायक! खालापूर दरड दुर्घटनेतील मृतांमध्ये भवर आणि पारधी कुटुंबातील सर्वाधिक सदस्य
येत्या १५ ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank account) जमा करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर बाजार समित्यांसह इतर ठिकाणी विकलेल्या कांद्याला अनुदान देण्यासोबत ई-पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान दिले जाणार आहे, अशी घोषणा पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या चार नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
दरम्यान, राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिले जाणार असे जाहीर केले होते. परंतु घोषणेला तीन महिने होऊनही अजून शेतकऱ्यांना हे अनुदान आले नाही. त्यामुळे सभागृहात आमदार अमोल मिटकरी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील यांनी सरसकट अनुदानाची मागणी केली.
अभिमानास्पद! इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या मदतीला निघाला ‘लालबागचा राजा’
अनुदानासाठी राज्यातील एकूण तीन लाख दोन हजार ४४४ शेतकरी पात्र ठरले असून त्यासाठी ७५५ कोटी ६४ लाखांची गरज आहे. मात्र, अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये फक्त ५५० कोटींचीच मागणी केली असल्याने उरलेल्या रकमेची तरतूद करून अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.