देशातील कोट्यवधी लोक मोफत रेशनची सुविधा घेत आहेत. या रेशनकार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने ( Central Government) आणखी एक मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेत असणाऱ्या लोकांना दर महिन्याला 35 किलो मोफत धान्य मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्ड ( Ration Card) धारकांना मोठे गिफ्ट मिळाले असून 1 जानेवारी पासून मोफत अन्नधान्याची ही सुविधा मिळणार आहे. देशातील 80 कोटींहून अधिक नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
धक्कादायक! पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटून अग्नितांडव
अन्न मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेशनची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये 35 किलो धान्य मिळणार आहे तर NFSA अंतर्गत प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती आणि दरमहा मोफत रेशनची सुविधा मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला ५ किलो मोफत रेशन मिळेल, असे देखील सांगण्यात आले आहे.
जगातील पहिले रोबोट कॅफे! कॉफी पासून स्नॅक्स पर्यंत रोबोटच बनवून हातात देणार…
मागील वर्षी लाभार्थ्यांना गहू व तांदूळ यासाठी 1 व 2 रुपये खर्च करावा लागत होता. मात्र यंदा मोफत रेशन मिळणार आहे. यासाठी सरकार 2023 मध्ये 2 लाख कोटींहून अधिक खर्च करणार आहे. यामुळे यंदाच्या वर्षी देशातील गरीब व इतर घटकांना अन्नधान्याची काळजी करावी लागणार नाही.
पिंपरी ग्रामपंचायतच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा