फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्राम वर ब्लू टिकचे फिचर आहे. ज्या व्यक्तींच्या अकाउंट समोर ब्लू टिक असेल त्या अकाउंट बाबत लोकांच्या मनात विश्वासार्हता वाढते. थोडक्यात काय तर सोशल मीडिया अकाउंटसमोरील ब्लू टिक हे एकप्रकारचे स्टेटस सिम्बॉल बनले आहे. दरम्यान मध्यंतरी मेटा व ट्विटर या दोन्ही कंपन्यांनी ब्लू टिक (Blue tick) संदर्भात एक नवीन धोरण आणले होते. या धोरणानुसार ब्लू टिक मिळवण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागणार होते.
“लावणी कशी असते याचा मी अभ्यास केलेला नाही, तर मी डीजे शो…” गौतमी पाटीलचे मोठे वक्तव्य
दरम्यान आघाडीचे सर्च इंजिन (Search Engine) समजल्या जाणाऱ्या गूगलने (Google) देखील नुकतीच ब्लू टिक बाबत मोठी घोषणा केली आहे. गुगलने आपल्या जीमेल या खास सेवेसाठी ब्लू टिक देण्याचा विचार केला आहे. यामुळे जीमेलवर सुद्धा आता ब्लू टिक ( Blue Tick) दिसणार आहे. ईमेलवर खास ओळख पटवण्यासाठी आणि स्पॅम व फ्रॉड जीमेलद्वारे फसवणूक टाळण्यासाठी गूगलने ही मोठी अपडेट आणली आहे.
याआधी गुगलने जीमेल मध्ये ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन ( Brand Indicator for message identification) हे फिचर आणले होते. या फिचरमुळे ईमेल सोबत ब्रँडचा लोगो सुद्धा दिसत होता. ज्या कंपनीकडे हे फिचर होते त्या कंपन्यांना ब्लू टिकचे फिचर आपोआप लागू होणार आहे. ट्विटर, मेटा पाठोपाठ आता गूगलने केलेल्या ब्लु टिकच्या घोषणेमुळे लोकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.