मुंबई : छोट्या पडद्यावरील मालिका “साथ निभाना साथिया फेम” ‘गोपी बहू’ म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. देवोलीना भट्टाचार्जी लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिला मोठा धक्का!
तिच्या लग्नाची गोष्ट ऐकूण तिच्या चाहत्यांना आनंदसोबत आश्चर्याचा धक्का देखील बसणार आहे. कारण मागच्या काही दिवसांत तिच्या लग्नाविषयी कोणतीच चर्चा नव्हती. मात्र, मंगळवारी अचानक तिला हळद लागल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते चकित झाले आहेत.
बिग ब्रेकिंग! टिकटॉक स्टार संतोष मुंडेंचा विजेच्या धक्क्याने मृत्यु
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये देवोलीनाला हळद लागल्याचं दिसत आहे. यामध्ये देवोलीनाचा खास मित्र विशाल सिंह तिला हळद लावत असल्याचा एक फोटो एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देवोलीनाने अद्याप तिच्या लग्नाची घोषणा केली नाही. पण तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून देवोलीना खरंच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय.
शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…