Site icon e लोकहित | Marathi News

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

Gopichand Padalkar criticized Supriya Sule, said...

मुंबई : रविवारी सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde Fadanvis government) सरकारवरही टीकेचे बाण सोडले होते. दरम्यान या टीकेला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar)म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, याचे पवार कुटुंबाला (pawar family)दु:ख आहे. कोणी मोठे झालेले सुप्रियाताईंना देखवत नाही.’

Urvashi Rauteel: “पंत भाई के लिए पनौती हो तुम…”, काल भारत- पाक सामन्यानंतर उर्वशी रौतेलावर संतापले युजर्स

नेमक्या काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे

‘राज्यातील सत्ताधार्‍यांनी ५० खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला आहे.तसेच महत्वाचं म्हणजे गेल्या अडीच महिन्यात कामे त्या वेगाने चालली नाहीत. तेवढे यांचे दौरेच असतात.आणि ही दौरे फक्त एक किलोमीटरच्या आतमध्ये असतात.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्यातरी घरी दिसतात.मागच्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. सत्ताधाऱ्याना सर्वसामान्य जनतेची सेवा करायची का नाही हे कळत नाही.,’ अशा शब्दांत फडणवीस-शिंदे सरकारवर टीका केली होती.

Salman Khan: सलमानने चक्क काचेचा भरलेला ग्लास ठेवला जीन्सच्या खिशात, व्हिडिओ झाला व्हायरल

गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘ सुप्रिया ताईंचा असा समज आहे की, आपले वडील हेच राज्यातले मुख्य आहेत. तेच राज्यात सर्व काही बदल करू शकतात.पवार कुटुंबाचे सर्वांत मोठे दु:ख म्हणजे सामान्य मराठा कुटुंबातील एक चांगला चेहरा राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. एकनाथ शिंदेमागे ५० आमदार ठामपणे उभे राहिले.अजित पवारही फुटले होते, पण त्यांच्यामागे दोन आमदारही राहिले नाहीत.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खूप चांगल्याप्रकारे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना हे सहन होत नाही.’

Sanjay Raut: संजय राऊतांचा आर्थर रोड मुक्काम वाढला, पण न्यायालयाने दिली ‘ही’ परवानगी

Spread the love
Exit mobile version