
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. पण हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. गोपीचंद पडळकर म्हणाले, “काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भले होऊ द्यायचं नाही”,
उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरं तर काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भले होऊ द्यायचे नाही. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच माणसाचं भलं करण्यात रस आहे”.
पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांच दुखं हेच आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली. त्यामुळे त्यांच्या पोटात कळा उठत आहे”.