Gopichand Padalkar । मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी इंदापूर या ठिकाणी ओबीसी समाजाची मोठी जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी अनेक नेते उपस्थित होते. यामध्येच आमदार गोपीचंद पडळकर यांचा देखील समावेश होता. ही सभा पार पडल्यानंतर अण्णा काटे यांच्या उपोषणा स्थळी जात असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक करण्यात आली. आता या घटनेवर गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Gopichand Padalkar on the case of throwing slippers Indapur )
याबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “ओबीसी समाज हा अत्यंत शांततामय पद्धतीने आपल्या हक्काच्या आरक्षणाबाबत बाजू मांडत आहे. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जात असताना हा नौटंकीचा प्रकार घडला असल्याच त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे. यामागचा सूत्रधार नेमका कोण आहे? हे आम्हा सर्वांना माहित आहे, कारण ती स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे शत्रू आहेत. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
OBC reservation । मोठी बातमी! “…तर ओबीसीचं सगळं आरक्षण एकाच दिवशी रद्द होऊ शकतं”