Gopichand Padalkar । सर्वात मोठी बातमी! गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका; स्वतःच दिली माहिती

Gopichand Padalkar

Gopichand Padalkar । धनगर यात्रेनिमित्त गोपीचंद पडळकर सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज बीड मधील सभेत त्यांनी एक मोठं वक्तव्य केल आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी धडपड करत आहे. मात्र ही गोष्ट त्यांना पाहवत नाही. माझ्यात जीवाला धोका आहे कारण आपल्या समाजाचा आवाज जर एकत्र झाला तर काहींना राजकारण करणे अवघड जाईल असं खळबळजनक वक्तव्य पडळकर यांनी केले आहे.

NCP Crisis । शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का? सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या याचिका

त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आज बीड मधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना पडळकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, अहिल्यादेवी यांच्यासोबत घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावा कारण बाबासाहेबांनी सांगितले की, जो समाज आपली ओळख विसरतो तो नव्याने इतिहास घडू शकत नाही असे देखील ते म्हणाले आहेत.

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांची कानशिलात सुजवली; ठाकरे गटाचा हल्लाबोल

सध्या राज्यभर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. जालन्याचे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी सुरू आहे. यामध्येच आता गोपीचंद पडळकर यांनी थेट पवारांवर हल्लाबोल केला आहे. आपल्या जीवालाही धोका असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.

Ambegaon News । शेवटी ती आईच! पोटच्या बाळासाठी बिबट्याशी लढली, अखेर…

Spread the love