राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवर शरद पवारांनी घाण आणि नीच राजकारण केले असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांनी केला आहे. इतकंच नाही तर आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौडबंगाल करत आहेत. असा आरोप करत गोपीचंद पडळकर यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना टोला मारला आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुक; मनसेचा भाजपला पाठिंबा जाहीर
कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेमध्ये शरद पवारांविषयी ( Sharad Pawar) बोलताना गोपीचंद पडळकर यांनी टोकाची भूमिका घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘तारक मेहता..’मधील जेठालालने दयाबेनविषयी अखेर सोडलं मौन म्हणाले…
“आदिवासी जमातीसह इतर 33 जमातींवरती अन्याय करण्यासाठी पवारांनी काही लोकांना जवळ ठेवले होते. ते लोक आदिवासी जमातीचे होते. इतकंच नाही तर धनगर समाजाच्या आरक्षणास विरोध करणारे लोक सुद्धा पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार फक्त एक माणूस आहे, म्हणून मी दरवेळेस पवारांवर बोलतो. शरद पवारांनी घाण व नीच काम केले आहे.” अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे.