भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, त्यामुळे ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल’, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
”उर्फी जावेद मुलगी नाही किन्नर”
सध्या गोपीचंद पडळकर या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या वक्तव्यांनंतर अमोल मिटकरी यांनी पाडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा”, अमोल मिटकरी यांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल
मिटकरी म्हणाले, “हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल..”