Site icon e लोकहित | Marathi News

लग्न झाले, नवऱ्याने हनिमूनचं प्लॅनिंगही मात्र तिने…, बीडमधील घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Got married, husband planning honeymoon but she..., you will also be shocked after reading the incident in Beed.

लग्नाचे (Marriage) सुरुवातीचे काही दिवस नवविवाहित जोडप्यासाठी मंतरलेले असतात. या दिवसात पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाचे बंध तयार होत असतात. मात्र बीडमध्ये (Beed) लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नवविवाहित वराला त्याच्या पत्नीने धोका दिला आहे. याठिकाणी नववधू घरातून सोने व रोख रोकड घेऊन लंपास झाली आहे. याप्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Newly marride bride cheated with groom)

Car Accident | भीषण अपघात! रस्त्यावर गाड्यांची वर्दळ कमी म्हणून वेगात कार चालवणे पडले महागात! अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू

नितीन उबाळे या तरुणाचा भारत मेट्रिमनी विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह झाला होता. याठिकाणी अडीच हजार रूपये शुल्क भरून त्याने नावनोंदणी केल्यानंतर त्याला आशा नामक मुलीचे स्थळ आले होते. आळंदीमध्ये या दोघांचा विवाह झाला. त्यानंतर दोघेही बीडमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले. दरम्यान लग्नाला १३ दिवस पूर्ण होताच आशा घरात कोणालाच कल्पना न देता निघून गेली.

घनश्याम दराडेचा गौतमी पाटीलला गंभीर इशारा; म्हणाला, “महाराष्ट्राचा बिहार करू नये नाहीतर…”

घरातून बाहेर पडताना आशाने सत्तर हजारांची रोकड व चार तोळे सोने सोबत न्हेले. एवढंच नाही तर लग्नाआधी आशाच्या वडिलांनी नितीन कडून दोन लाख घेतले होते. यामुळे नितीनची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी नितीनने आशा, तिचे आई-वडील व भाऊ यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Loksabha Elections | अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची लगबग सुरू; आज मातोश्री वर होणार महत्त्वाची बैठक

Spread the love
Exit mobile version