दिल्ली : दिवाळीचा सण जवळ जवळ आला की सगळ्या कामगारांना बोनसची उस्तुक्ता लागते. बोनस म्हणजे मिळणाऱ्या पागरापेक्षा जास्त रक्कम मिळते दिवाळीचा हा बोनस नोकरदार वर्गाला चांगलाच दिलासा मिळतो.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद बोनसमुळे गगनात मावेनासा झालाय. सरकारी कर्मचाऱ्यांना असा बोनस मिळताना पाहून खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या नोकरदारांना आता सरकारी क्षेत्रातील (Government jobs) नोकरीचा शोध घेणार असं म्हणायला हरकत नाही.
मोठी बातमी! थ्री इडियट्स फेम ‘या’ अभिनेत्याचे अचानक निधन
पण महत्वाची बाब म्हणजे दिवाळीच्या आधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी झाली पण ती महाराष्ट्रात नसून दिल्लीत झाली आहे. दिल्ली सरकारच्या (Delhi Government) बैठकीत महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्त्वाखाली एका समितीनं घेतला. इतकंच नाही तर राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही खास दिवाळी भेट देण्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला. तसेच केंद्राकडून या अधिकृत आदेशानुसार निर्धारित दरांनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवला.
Salman Khan: ‘या’ अल्पवयीन मुलाला दिली होती सलमान खानची सुपारी, दिल्ली पोलिसांनी केली अटक
केंद्राच्या तिजोरीवर 12,852 कोटी रुपयांचा अधिक भार
विशेष म्हणजे 28 सप्टेंबर रोजी केंद्रात कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी कर्मचारी आणि पेंशनर्सच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती.दरम्यान यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन लाभार्थी 1 जुलै 2022 पासून डीए आणि डीआरच्या वाढीव रकमेचे हक्कदार असतील असं सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या तरतुदीमुळं केंद्राच्या तिजोरीवर 12,852 कोटी रुपयांचा अधिक भार पडणार आहे.