सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार; 19 लाख कर्मचाऱ्यांचा असणार सहभाग

Government employees will go on indefinite strike from today; 19 lakh employees will participate

राज्यात मागील काही दिवसांपासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. मात्र याबाबत सरकारची बैठक झाली असली तरी, ठोस असा निर्णय न झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून पुन्हा एकदा संप पुकारणार आहेत. ( Governmet employee strike)

ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळच्या विश्वासू व निष्ठावान कार्यकर्त्याने केला शिंदे गटात प्रवेश!

2005 च्या पूर्वी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ( Pension scheme) लागू करावी तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करावी आणि शिक्षकांची रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावी या मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते.

गौतमी पाटीलचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पाहा व्हिडीओ

यापार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीत जुन्या पेन्शनबाबत समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. परंतु, सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात येत असले तरी, निर्णयाची कोणतीही शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत.

समुद्र किनाऱ्यावर घडली धक्कादायक घटना; सहलीला गेलेले चार विद्यार्थी बुडाले

दरम्यान आजपासून राज्यातील 19 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांतील कर्मचारी सुद्धा संपावर जाणार आहेत.

“हिंदूंच्या घरामध्ये जर दोन मुल असतील तर त्यातील एकाला…” बागेश्वर बाबांचे मोठे वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *