Site icon e लोकहित | Marathi News

Government Hospital । शासकीय रूग्णालयात धक्कादायक प्रकार; पेशंटच्या खाटांवर कुत्रे करतायेत आराम

Goverment Hospital

Government Hospital । सध्या मिरजच्या शासकीय रूग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी रूग्णांच्या खाटांवर कुत्रे आराम करत असल्याचे फोटो समोर आले आहेत. या रुग्णालयाचे फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

Gopichand Padalkar । पडळकरांविरोधात संतापाची लाट! इंदापूरमध्ये पडळकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जलसमाधी

पहा रोहित पवार यांचे जशेच्या तशे ट्विट

रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिले की, “एका कार्यकर्त्याने पाठवलेला मिरज शासकीय रुग्णालयाचा हा फोटो आहे. येथे कदाचित माणसांसोबत पाळीव प्राण्यांचा पण उपचार केला जात असावा. हि अभिनव योजना कालच्या जाहिरातीमध्ये देण्यास आरोग्यमंत्री विसरले असतील. या योजनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल, शासनाने केवळ आरोग्यमंत्र्यांचे नामांकन करायला हवे”?

Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप; म्हणाले, “सही करा नाहीतर…”

“स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत पण माझ्या मतदारसंघात ४०% काम पूर्ण झालेल्या शासकीय दवाखान्यासाठी तसेच राज्यातल्या इतर भागात आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाकडे निधी पैसे नाहीत. अशा गलथान कारभाराला आता #THR_RISE_OF_HEALTHY_MAHARASHTRA म्हणायचे का”? असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Lalbaug Raja । गणेशोत्सवाला गालबोट! लालबागच्या राजाच्या मंडपातच फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

Spread the love
Exit mobile version