Government Rule For Social Media । सध्याची तरुण पिढी ही जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. सोशल मीडियामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या अप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सोशल मीडियावर आपल्याला एका चुटकीत सर्व गोष्टींची माहिती मिळते. मात्र सोशल मीडियावर बऱ्याचदा लोक एकापेक्षा जास्त अकाउंट बनवतात. त्यामुळे डेटा गोळ्या करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळेच आता सोशल मीडिया युजरसाठी सरकारने एक नवीन नियमी जारी केला आहे. (Government Rule For Social Media )
Accident । बस आणि डंपरचा भीषण अपघात! २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू तर २० गंभीर प्रवासी जखमी
सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शनच्या शिफारसीनंतर एक निर्णय घेतला आहे. यामध्ये सोशल मीडिया युजरला माहिती न देता त्यांचे अकाउंट डिलीट केले जाणारे जाईल. सरकारच्या नवीन नियमानुसार ज्या युजरने तब्बल तीन वर्षापासून सोशल मीडिया अकाउंट वापरले नाही त्यावर कोणत्याही प्रकारची पोस्ट किंवा माहिती शेअर केली नाही असे अकाउंट सरकार बंद करू शकते. सोशल मीडिया बाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Accident । बस आणि डंपरचा भीषण अपघात! २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू तर २० गंभीर प्रवासी जखमी
हा नियम ई-कॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस, गेमिंग कंपनी त्याचबरोबर सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ज्या युजरने खूप दिवस आपले सोशल मीडिया अकाउंट उघडले नाही. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते कारण सरकार कोणत्याही क्षणी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट करू शकते.
बऱ्याचदा अनेकजण सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड विसरतात त्यामुळे पासवर्ड विसरले की नवीन अकाउंट उघडतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. खूप दिवस सोशल मीडिया अकाउंट न वापरल्यास तुमचे अकाउंट डिलीट केले जाईल.